एक जुलै 2014 रोजी भांडुप परिसरातील एका तेरा वर्षाच्या मुली ला जळाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान असे लक्षात आले की शेजारील व्यक्ती समीर घुगरे हा त्या मुलीस व तिच्या अन्य मैत्रिणींना त्याच्या मोबाईल मध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ दाखवून त्यांच्या शरीराला स्पर्श करीत असे. त्या जाचाला कंटाळून तेरा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली असा पोलिसांचा असा आरोप होता.
मुंबई : आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची न्यायालयाने पुराव्यांअभावी मुक्तता केली पण मुंबई पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना खळबळजनक पुरावा सापडला. या पुराव्याच्या आधारावरच पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीला न्याय दिला आहे. हे प्रकरण सात वर्षांपूर्वीचे आहे.
एक जुलै 2014 रोजी भांडुप परिसरातील एका तेरा वर्षाच्या मुली ला जळाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान असे लक्षात आले की शेजारील व्यक्ती समीर घुगरे हा त्या मुलीस व तिच्या अन्य मैत्रिणींना त्याच्या मोबाईल मध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ दाखवून त्यांच्या शरीराला स्पर्श करीत असे. त्या जाचाला कंटाळून तेरा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली असा पोलिसांचा असा आरोप होता.
पोलिसांना या केसमध्ये मयत मुलींनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली होती त्याच्या आधारावर रेप तसेच लहान बालकाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याबद्दल व तसेच आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर सुसाईड नोट ही मयत मुलीच्या हस्ताक्षरात सोबत मॅच न झाल्यामुळे कोर्टाने ती ग्राह्य धरली नाही. तसेच मयत मुलीने दवाखान्यात नेत असताना तिच्या काकांना असे सांगितले की पाणी गरम करत असताना अपघात होऊन ती जळाली.
यामुळे लहान मुलीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची सिद्ध होत नाही असे आरोपीचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांचे म्हणणे होते. रेप बद्दल सुद्धा कुठलाही पुरावा माननीय कोर्टासमोर आला नाही असा सुद्धा युक्तिवाद बचाव पक्षाने मांडला तो स्वीकारत रेप व आत्महत्येस प्रवृत्त करणे या आरोपातून मुक्त केले.
मात्र, आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ मिळाला असल्याने व कोर्टामध्ये अन्य 3 लहान मुलींनी दिलेल्या साक्षीच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 354, 293, पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा आरोपीस देण्यात आली तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 (अ) नुसार रुपये एक लाख दंड ठोठावण्यात आला. घटना घडल्यापासून आरोपी जेलमध्ये आहे.