covishield vaccine

कांदिवलीमधील हिरानंदानी सोसायटीत(Hiranandani Society) बोगस (Bogus Vaccination In Kandivali) लसीकरणातील कोव्हिशिल्ड लसीचे डोस गुजरात, दीव आणि दमणसाठी पाठवले होते, असे स्पष्टीकरण पुण्याच्या ‘सिरम’ इन्स्टिट्युटने(Serum Institute clarification To BMC) मुंबई महानगपालिकेला दिले आहे.

    मुंबई: कांदिवलीमधील हिरानंदानी सोसायटीत(Hiranandani Society) बोगस लसीकरण(Bogus Vaccination In Kandivali) झाल्याचे समोर आले होते. या लसीकरणातील कोव्हिशिल्ड लसीचे डोस गुजरात, दीव आणि दमणसाठी पाठवले होते, असे स्पष्टीकरण पुण्याच्या ‘सिरम’ इन्स्टिट्युटने मुंबई महानगपालिकेला दिले आहे. ‘सिरम’ने दिलेली ही प्राथमिक माहिती आहे. लवकरच याबाबतचे लेखी उत्तर दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत ३० मे रोजी ३९० जणांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र लसीकरणानंतर मिळालेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या केंद्रांची देण्यात आली. यावर वेगवेगळी तारीख नोंदवण्यात आली होती. लसीकरण करताना लाभार्थ्यांना फोटोही काढू देण्यात आला नव्हता. शिवाय लसीकरणानंतर लाभार्थ्यांमध्ये कोणतीही साधारण लक्षणेही दिसली नाही. रहिवाशांकडून १२६० रुपये मात्र शुल्क घेण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार केली.

    या प्रकरणी पालिकेने चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात १२० बनावट सर्टिफिकेटवर ‘सिरम’च्या कोव्हिशिल्डच्या बॅचचा उल्लेख होता. यानुसार पालिकेने या डोसबाबत ‘सिरम’कडे पत्र पाठवून माहिती मागवली होती. त्यानुसार या लसीचे डोस गुजरात, दीव, दमणसाठी पाठवले होते, असे सिरमने पालिकेला स्पष्ट केले आहे.