समृद्धी महामार्गाच्या कामामुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण; सर्वपक्षीय सदस्यांची विधानसभेत तक्रार, सरकारकडून तातडीने दुरुस्तीची ग्वाही!

वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या डंपर्स मुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दोन प्रश्न या तासात लागोपाठ उपस्थित करण्यात आले होते,  त्यावर छापील उत्तरात मंत्र्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे सदस्यांनी विशेषतः सत्तारूढ सदस्यांनी लक्षात आणून दिले. मात्र, जिथे तक्रार असेल तिथे तातडीने दुरुस्ती केली जाईल असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या  शेतात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावर नुकसान भरपाई देऊ असेही मंत्री शिंदे म्हणाले.

    मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम करताना होणाऱ्या मालवाहतूकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. अशी  तक्रार सर्वपक्षीय सदस्यांनी विधानसभेत केली, त्यावर संबंधित कंत्राटदारांकडून ते तातडीने दुरुस्त करून घेतले जातील अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

    वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या डंपर्स मुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दोन प्रश्न या तासात लागोपाठ उपस्थित करण्यात आले होते,  त्यावर छापील उत्तरात मंत्र्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे सदस्यांनी विशेषतः सत्तारूढ सदस्यांनी लक्षात आणून दिले. मात्र, जिथे तक्रार असेल तिथे तातडीने दुरुस्ती केली जाईल असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या  शेतात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावर नुकसान भरपाई देऊ असेही मंत्री शिंदे म्हणाले.

    मुंबई गोवा महामार्गाबाबत लवकरच काम पूर्ण

    यावेळी मुंबई गोवा महामार्गाबाबत अखेर काम कधी पूर्ण होणार ते तरी सांगा? अशी विचारणा सेनेच्या भास्कर जाधव यांनी यावेळी  केली. कंत्राटदाराना मदत करूनही वेळेवर काम न केल्याने ते रखडल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी मदत केली आहे. आता कंत्राटदार बदलला आहे तेव्हा काम लवकर पूर्ण होईल असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.