महिलांच्या सक्षमीकरणासाठी शक्ती विधेयक एकमताने मंजूर – यशोमती ठाकूर

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आज विधान सभेत शक्ती विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आता वरील सभागृहात म्हणजे विधान परिषदेत जाईल आणि तिथे सुधा याला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. दरम्यान या विधेयकात महिलांसाठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच हे विधेयक दिल्लीत राष्ट्रपती याच्याकडे जाईल, तेव्हा ते सकारात्मकतेने घेतली आणि पास करतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

    मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आज विधानसभेत शक्ती विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आता वरील सभागृहात म्हणजे विधान परिषदेत जाईल आणि तिथे सुद्धा याला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. दरम्यान या विधेयकात महिलांसाठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच हे विधेयक दिल्लीत राष्ट्रपती याच्याकडे जाईल, तेव्हा ते सकारात्मकतेने घेतली आणि पास करतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

    महिला आणि बालिकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाला आळा घालण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला  शक्ती ‘फौजदारी कायदा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. काल या संदर्भात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल सभागृहात मांडण्यात आला. राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढत असताना आपण बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, तांत्रिक बाबींचा आधार घेत न्यायालयातून आरोपी सुटू नये यासाठी शक्ती कायद्यात सुधारणा करण्यात आले आहेत अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.

    गृहमंत्री म्हणाले की,  शक्ती ‘फौजदारी कायदा परिपूर्ण असल्याचा आमचा दावा नाही मात्र दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीने यावर सखोल विचार केला आहे, संबंधित सर्व तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत तसेच सर्व सामान्यांच्या सूचनाही यात विचारात घेण्यात आल्या असल्याचे गृहमंत्री म्हणाले. यावर मत व्यक्त करताना केवळ कायदा करून चालणार नाही तर न्यायदान प्रक्रियेतही बदल करावे लागतील असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चे दरम्यान मांडली. कोपर्डी घटनेत जलदगतीने न्यायदान होऊनही अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.