शक्ती मिल बलात्कार प्रकरण: तिन्ही आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द, सगळ्यांना जन्मठेप

२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागात असलेल्या शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. तिथे पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप झाला होता.विशेष म्हणजे एका १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता.

    मुंबई : मुंबईतील शक्ति मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्ट आज अंतिम निकाल देण्यात आला आहे. तब्बल ८ वर्षांहुन अधिक काळ या घटनेला उलटला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर आज अंतिम निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपी विजय जाधव, मोहम्मद बेंगाली, मोहम्मद अंसारी यांची फाशीची शिक्षा रद्द करून आजन्म कारावासाची शिक्षा न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावली आहे.

    काय आहे प्रकरण?

    २२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागात असलेल्या शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. तिथे पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप झाला होता.विशेष म्हणजे एका १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. यातील आरोपी तेच होते. मार्च २०१४ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने आधी यातील तिघा सामाईक आरोपींना दोषी ठरवले. त्यानंतर फोटोग्राफरवर तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातही दोषी ठरवले.