शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, पोटाचा त्रास जाणवल्याने ब्रीच कँडीमध्ये नेल्याची नवाब मलिक यांनी दिली माहिती

शरद पवार (sharad pawar admitted in breach candy hospital) यांना पुन्हा पोटाचा त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं नवाब मलिक(nawab malik tweet) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी २ दिवसांपुर्वीच पवारांना आजसारखाच त्रास होत होता. त्यामुळे त्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती.

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या म्हणजेच बुधवारी एंडोस्कोपी आणि सर्जरी होणार होती. मात्र त्यांना आजच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.

    शरद पवार यांना पुन्हा पोटाचा त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी २ दिवसांपुर्वीच पवारांना आजसारखाच त्रास होत होता. त्यामुळे त्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. बुधवारी सर्जरी करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आज पुन्हा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये दिली आहे.

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, हा बॉल स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी डॉक्टर मायदेव त्यांच्यावर उद्या एंडोस्कोपी करतील. त्यांची प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचं कोणchतंही कारण नाही. उद्या दुपारी ३ च्या सुमारास एंडोस्कोपी केली जाणार आहे.