शरद पवार आणि अमित शहा यांची कोणतीही भेट नाही; नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे.

    मुंबई (Mumbai).  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि एका वृत्तपत्रामध्ये लहान बातमी करुन चॅनेलवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

    ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.