सोमैय्यांवरील कारवाईशी शरद पवार आणि मुख्यमंत्र्याचा काही संबंध नाही; गृहमंत्र्याचा खुलासा

सोमय्या यांनी त्यांच्यावरील कारवाई मागे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निर्दैश असल्याचा आरोप केला होता मात्र गृहमंत्री वळसे पाटील यांनी तो फेटाळत हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, साधारणपणे अशा प्रसंगी वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती देत असतात. मात्र या घटनेत मुख्यमंत्र्यांना कल्पना देण्यात आली होती की नाही,याची आपणांस कल्पना नसल्याचे ते म्हणाले. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा करत जो काही निर्णय घेतला गेला तो गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे हीच वस्तुस्थिती आहे, असाही खुलासा वळसे पाटील यानी केला आहे.

    मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोल्हापूरात जावून गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमैय्या यांना मुंबईपासून कराड पर्यंत महाराष्ट्र पोलीसांनी पाठीमागे लागून कराड मध्ये स्थानबद्ध केले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर भाजपने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर गृहमंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून या कारवाईची नेमकी जबाबदारी घेण्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेने याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांनीही भाजपचे सर्व आरोप फेटाळत हा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्याचे सांगितले आहे.

    संघर्ष होवू नये यासाठी कारवाई

    मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्याशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही, सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गृह विभागाच्या समोर वस्तुस्थिती मांडल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून संघर्ष होवू नये यासाठी कारवाई करण्यात आल्याचे वळसे पाटील म्हणाले. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहितीवरून सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली. यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    शरद पवार आणि मुख्यमंत्र्याचा संबंध नाही