शरद पवारांनी काँग्रेस सोडली नाही, त्यांना पक्षातून काढलं होतं, मंत्री रामदास आठवले यांचं मोठ विधान

याआधी देखील राणे विरुध्द शिवसेना राड्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री आठवले म्हणाले होते की, “दोन मोठ्या पक्षांनी अशा प्रकारचे राडे करणं योग्य नाही. केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंविरोधात अशाप्रकारे गुन्हा नोंदवणे अयोग्य आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे."

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नाही तर काँग्रेसने पवारांना पक्षातून काढलं असं मोठं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांनी एका सभेत “शरद पवार आमचे नेते नाहीत. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला” असं विधान केलं होतं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विवीध चर्चा रंगल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री गीतेंच्या या वक्तव्यावर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

    मुंबईत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, “आनंद गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरं आहे, मात्र ते महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. कारण, त्याकाळी सोनिया गांधी या परदेशी असल्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार, तारिक अन्वर, नगमा यांनी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात सोनिया गांधी(Sonia Gandhi) या परदेशी असल्याने त्या पंतप्रधान बनल्यास त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. त्यामुळे याचा विचार करायला हवा असं त्यांनी म्हटलं होतं. या घटनेनंतर शरद पवार यांना काँग्रेस पक्षातून काढलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणता येणार नाही.”

    ‘दसरा मेळाव्याआधी भाजपसोबत युती करा’ शिवसेनेला ऑफर

    शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला गती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा, असे आवाहन देखील रामदास आठवले यांनी केले आहे.

    दरम्यान, याआधी देखील राणे विरुध्द शिवसेना राड्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री आठवले म्हणाले होते की, “दोन मोठ्या पक्षांनी अशा प्रकारचे राडे करणं योग्य नाही. केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंविरोधात अशाप्रकारे गुन्हा नोंदवणे अयोग्य आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे.”