
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितले होते, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपावर टीकेची तोफ डागली(Sharad Pawar had said 25 years ago that BJP does not want unity of the country; Sanjay Raut targets BJP).
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितले होते, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपावर टीकेची तोफ डागली(Sharad Pawar had said 25 years ago that BJP does not want unity of the country; Sanjay Raut targets BJP).
देशात विकृत राजकारण सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. यावेळी राऊत बोलत होते. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आपण निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे. सोशल मीडियावर मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली त्यावरून फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे.
जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. पण आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरू आहे त्यावरसुद्धा पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत, असे राऊत म्हणाले.