sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्यामुळे रविवारी रात्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथं त्यांच्या पोटाशी संबंधित विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तातडीने दोन दिवसांत त्यांचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून दिलीय. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला म्हणजेच बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना पोटाशी संबंधित आजार असून त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला असल्याचं समजतंय.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्यामुळे रविवारी रात्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथं त्यांच्या पोटाशी संबंधित विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तातडीने दोन दिवसांत त्यांचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून दिलीय.

    दक्षिण मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात ३१ मार्च या दिवशी शरद पवार दाखल होतील. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या तब्येतीचा अंदाज घेऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबत विचार करण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांच्या ऑपरेशनची निश्चिती झाल्यानंतर या आठवड्यातले त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलीय.

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या काही प्रचारसभांचं पश्चिम बंगालमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आता बंगालच्या प्रचारात किमान पुढील आठवडा तरी पवार दिसणार नाहीत.