शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते; नबाब मलिकांचा खुलासा!

माध्यमांना माहिती देताना मलिक म्हणाले की, पवार यांनी अनेकदा याबाबत खुलासा केला असून केवळ दोन अंकी खासदारांच्या बळावर पंतप्रधानपदासाठी दावेदार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असून ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सध्या नाही. सध्याच्या घडीला पर्याय तयार करण्याचे काम सुरु आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, असे मलिकांनी नमूद केले आहे. 

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने पाच पैकी तीन राज्यांमधील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पुन्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर पक्षांचे राष्ट्रीय प्रवक्ता नबाब मलिक यांनी खुलासा करत पवार कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांना माहिती देताना मलिक म्हणाले की, पवार यांनी अनेकदा याबाबत खुलासा केला असून केवळ दोन अंकी खासदारांच्या बळावर पंतप्रधानपदासाठी दावेदार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असून ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सध्या नाही. सध्याच्या घडीला पर्याय तयार करण्याचे काम सुरु आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, असे मलिकांनी नमूद केले आहे.

    राजीनाम्याने भाजपविरोधी लाट असल्याचे सिद्ध

    मलिक म्हणाले की, पवार यानी भाकीत केल्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याने भाजपविरोधी लाट असल्याचे सिद्ध केले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणखी जसजशा जवळ येतील, तसतश्या अधिकाधिक रंजक गोष्टी पाहायला मिळतील.  निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची रणनीति ठरली आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. जागावाटपावरही कोणताही तिढा नाही, असे नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    असले प्रकार आम्ही कधीच केले नाही

    भाजपच्या नेत्यांनी पवार यांच्या कालच्या वक्तव्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना नवाब मलिक म्हणाले की, ‘पोपट चिट्ठी काढणे, भविष्य सांगणे, असले प्रकार आम्ही कधीच केले नाही. किती जागा येतील, याचे भाकित आम्ही कधीच वर्तवले नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून, शरद पवार स्वतः उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. तर मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर निवडणुका लढवणार आहे. तसेच गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणार उतरणार आहे. गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे आजही काम करत आहेत, गरज असेल तेव्हा ते बाहेर पडतील. मात्र, मुख्यमंत्र्यावर महत्वाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजपने केलेली टीका अयोग्य होती, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.