Sharad Pawar with trusted ministers at Varsha Bungalow: Disturbed with CM; Pratap Sarnaik's letter bomb and discussion on the issue of alignment with BJP

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या खास विश्वासातील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात मुख्यमंत्र्याशी खलबते झाली. पोलीस गृहनिर्माणच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. त्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे समजले जाणारे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर त्यावेळी उपस्थित होते.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या खास विश्वासातील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात मुख्यमंत्र्याशी खलबते झाली. पोलीस गृहनिर्माणच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. त्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे समजले जाणारे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर त्यावेळी उपस्थित होते.

    अधिवेशनात सत्ताधारी आघाडीवर भाजपकडून दबाव

    दरम्यान अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती करत सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. मात्र देशमुख यांना चौकशीअंती अटक झाल्यास महाविकास आघाडीमधील अन्य मंत्र्यावर दवाब वाढण्याची शक्यता आहे.

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांवर भाजपकडून राजकीय दबाव वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या डॅमेज कंट्रोल बाबत या बैठकीत खलबते झाल्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रताप सरनाईक यांच्या भाजपशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेचा अन्य आमदार आणि मंत्र्यांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यास सुरूवात केल्याचे मानले जात आहे.