‘मेट्रो कारशेड’ प्रकरणात शरद पवारांची मध्यस्थी, आता कोर्टाच्या बाहेरच प्रश्न निकाली काढण्याची शक्यता?

मेट्रोचा हा वाद सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांची भेटही घेणार असल्याची माहिती, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी दिली आहे.

मुंबईः कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथील मेट्रो कारशेडच्या (Metro Carshed) कामावर स्थगिती आणल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. मेट्रोचा हा वाद सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांची भेटही घेणार असल्याची माहिती, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी दिली आहे.

मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांना चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार हे मध्यस्थी करणार असल्याचीही चर्चा आहे.

मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. मेट्रोचे कारशेड ‘आरे’तून हलवून कांजूरमार्ग येथे कामाची सुरुवात करणाऱ्या राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.