‘अजित पवारांना मी पाठवलं नव्हतं’ पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांची प्रतिक्रीया

पवार म्हणाले की, “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती.”

    भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचं अजूनही बोललं जातं. यावर बोलताना पवार म्हणाले की, मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. त्यामुळे या आरोपांना काही अर्थ नाही. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    पवार म्हणाले की, “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती.”

    पवार पुढे म्हणाले की, “ही गोष्ट सत्य आहे, की माझी आणि पंतप्रधानांची चर्चा झाली होती. त्यांची इच्छा होती की, आम्ही एकत्र यावं. पण मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही. तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. आमची भूमिका ही वेगळी आहे. हे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं.” असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

    महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि मुख्यमंत्रीपदावरून निवडणुकीआधी जाहीर झालेल्या शिवसेना-भाजपा युतीत तणाव निर्माण झाला. यानंतर राज्याच्या इतिहासातील सर्वच राजकीय समीकरणं बदलली. यावेळी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र झोपेत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला आणि राजकीय भूकंप झाला.