कुणी काय काम केले? शिवसेना नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट होणार; आदित्य ठाकरे निवडणुकीच्या तयारीला लागले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट होणार आहे. शिवसेना नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी विभागवार नगरसेवकांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून प्रभागात होत असलेल्या कामांची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे(Shiv Sena corporators' work will be audited; Aditya Thackeray started preparing for the elections).

    मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट होणार आहे. शिवसेना नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी विभागवार नगरसेवकांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून प्रभागात होत असलेल्या कामांची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे(Shiv Sena corporators’ work will be audited; Aditya Thackeray started preparing for the elections).

    आदित्य ठाकरे यांनी नुकतीच दहिसर आणि बोरिवली परिसरातील शिवसेना नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी विभागातील अडचणी आणि काम करताना येणाऱ्या प्रशासकीय समस्यांबाबत आढावा घेतला. नगरसेवकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहितीही त्यांनी घेतली.

    आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीतून सुरू असलेल्या कामांचाही आढावा त्यांनी घेतला. त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी नगरसेवकांना दिले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022