शिवसेना युपीएचा भाग नाही; संजय राऊत यांचे मोठे विधान

शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना अद्याप युपीएचा भाग नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तथापि, देशात ‘मिनी युपीए’चा प्रयोग सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे राऊत म्हणाले(Shiv Sena is not part of UPA; Statement by Sanjay Raut).

    मुंबई : शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना अद्याप युपीएचा भाग नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तथापि, देशात ‘मिनी युपीए’चा प्रयोग सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे राऊत म्हणाले(Shiv Sena is not part of UPA; Statement by Sanjay Raut).

    सोनियांचा उद्धव ठाकरेंना फोन

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बिगर भाजपा पक्षांची एकत्रित रणनिती आखण्यासाठी तसेच, संसदेबाहेरही विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मंगळवारी सोनिया यांच्या निवासस्थानी झाली.

    आगामी काळात राज्या-राज्यांत विरोधकांचे धोरण ठरवण्यासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीला शिवसेनेच्या वतीने मी हजर होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तिथे उपस्थित राहण्यास सांगितले होते. कारण सोनिया गांधी यांनी बैठकी संदर्भात त्यांना फोन केला होता. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पुन्हा लवकरच बैठक व्हावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. त्यावरही फार वेळ न लावत भविष्यात अशा बैठका वेळेत व्हाव्यात जेणेकरून सर्वांना सोयीचे होईल अशी भूमिका घेण्यात आली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

    आम्ही युपीएचा भाग नाही. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे तीन प्रमुख पक्ष जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतात, काम करतात तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे. राज्य स्तरावरील हे युपीए असून उत्तम प्रकारे काम सुरू आहे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना