अडसूळ यांच्यावरील कारवाईला राजकारणाचा रंग देणं योग्य नाही; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

    मुंबई : शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली. भाजपने सुडापोटी कारवाई केल्याचा दावा अडसूळ यांनी केला(Shiv Sena leader Anandrao Adsul ED raid).यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Reaction of Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सुडापोटी कारवाई करण्याचे कारण नाही. भाजपची इच्छा असो वा नसो कायदाद्वारे कोणालाही कसेही वागता येत नाही. शेवटी न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना सुद्धा त्यांना दिलेल्या चौकटीत काम करावं लागतं. या प्रकरणात काही तक्रारी असतील अथवा तथ्य असेल म्हणूनचं कारवाई होत असावी त्यामुळे याला राजकारणाचा रंग देणं योग्य ठरणार नाही अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

    सुडापोटी कोणावरही कारवाई करता येत नाही. आली लहर म्हणून कोणालाही उचला आणि कारवाई करा असं होत नाही. या देशात आपली संविधान, घटना एवढी मजबूत आहे की न्यायाव्यवस्थेच्या पलीकडे कोणावरही कारवाई करता येत नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क अबाधित ठेवला आहे. म्हणून सरकारला वाटलं म्हणून यंत्रणेचा वापर केला तर असे काही होत नाही. त्यांच्याविषयी तक्रार असेल संदर्भ असेल तरचं त्यांच्यावर चौकशी होते कारवाई होत असते कोणालाही ईडी बोलवत असून कारवाई करत नाही असा टोला आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी लगावला.