एकनाथ खडसेंनंतर शिवसेना नेत्याचा नंबर; संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस?

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. राऊत यांनी हे वृत्त फेटाळले असून, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगीतले.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर कुणाचा नंबर लागणार अशी चर्चा सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. राऊत यांनी हे वृत्त फेटाळले असून, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगीतले.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने बजीवलेल्या नोटीसमध्ये त्यांना २९ डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.