शिवसेना आमदारशी व्हिडिओ कॉलवर व्यथा मांडली, नंतर बनावट अश्लील व्हिडिओ बनवून केला सेक्सटोर्शनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीची मागणी केली. व्हिडिओ कॉल कट होताच गुंडाने अश्लील व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ आमदारा कुडाळकर यांचाच होता, जो एडिट करण्यात आला होता. नंतर या गुंडाने ब्लॅकमेल करून आमदार कुडाळकर यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. आमदार मंगेश यांनी फोन-पेवर गुंडाला ५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका नंबरवरुन कुडाळकर यांना 11 हजार रुपयांची मागणी करणारा फोन आला. अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत गुंडाने पुन्हा 11 हजार रुपयांची मागणी केली होती.

  मुलगी असल्याचे भासवून शिवसेनेच्या आमदाराला गोवल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका आमदाराला भरतपूर येथील गुंडाने लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री भरतपूर येथील सिक्री येथून या गुंडाला अटक केली आहे. या सेक्स व्हिडीओ प्रकरणात अडकलेली व्यक्ती मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत.

  केमकं काय घडलं?

  आमदार मंगेश कुडाळकर यांना 20 ऑक्टोबरला रात्री एक मेसेज आला. हा संदेश स्वतः मौसमदीनने केला होता. गप्पांमध्ये गुंडाने स्वत:ला महिला असल्याचे भासवून कुडाळकर यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी महिलेला मदत करण्याचे मान्य केले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला.

  या महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीची मागणी केली. व्हिडिओ कॉल कट होताच गुंडाने अश्लील व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ आमदारा कुडाळकर यांचाच होता, जो एडिट करण्यात आला होता. नंतर या गुंडाने ब्लॅकमेल करून आमदार कुडाळकर यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. आमदार मंगेश यांनी फोन-पेवर गुंडाला ५ हजार रुपये पाठवले.

  त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका नंबरवरुन कुडाळकर यांना 11 हजार रुपयांची मागणी करणारा फोन आला. अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत गुंडाने पुन्हा 11 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात सेक्सटोर्शनसह ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला.

  दरम्यान, या प्रकरणात आमदार कुडाळकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला असता त्यांनी या प्ररणी बोलायला नकार दिला आहे.