pratap sarnaik shivsena

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे. हे बांधकाम एक इंचही अनधिकृत असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले( Shiv Sena MLA Sarnaik's clear statement on BJP leaders' allegations).

  मुंबई : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे. हे बांधकाम एक इंचही अनधिकृत असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले( Shiv Sena MLA Sarnaik’s clear statement on BJP leaders’ allegations).

  भाजपा नेत्यांनी अभ्यास करून बोलावे

  सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रपरिष घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. फडणवीस सरकारच्या काळात नगरविकास खात्याने विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही, असे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत शिवसेनेच्या जोरावर खासदार झालेल्या किरीट सोमय्या आणि भाजपावाल्यांनी अभ्यास करून बोलावे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. सोमय्या यांना दंड किती होता हे देखील माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

  सरकारमधील मंत्र्यानेच बातमी लीक केल्याचा दावा

  महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांने जाणीवपूर्वक मंत्री मंडळात हा विषय येण्याआधी एका वृत्तपत्रला दिला होता. तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड माफ केला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ठाण्यात अमराठी बिल्डरांना सर्व सुट दिली गेली मात्र सरनाईक शिवसेनेचा आमदार आहे आणि मराठी उद्योजक आहे म्हणून जाणीवपुर्वक त्रास दिला गेला. मी आणि या इमारतीतील रहिवाशी हे मराठी आहेत. याचा विचारही कोणी केला नाही अशी खंत प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवली.

  हे सुद्धा वाचा
  • 2022