शिवसेनाही उतरणार उत्तर प्रदेशच्या निवडणूकीच्या रिंगणात; शिवसेना ५० जागा लढविणार असल्याची संजय राऊत यांची माहिती

शिवसेनेनेही उत्तरप्रदेशमध्ये ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाचपैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनीही यासंदर्भात माहिती दिली आहे(Shiv Sena will also contest in Uttar Pradesh elections; Sanjay Raut informed that Shiv Sena will contest 50 seats).

  मुंबई : शिवसेनेनेही उत्तरप्रदेशमध्ये ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाचपैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनीही यासंदर्भात माहिती दिली आहे(Shiv Sena will also contest in Uttar Pradesh elections; Sanjay Raut informed that Shiv Sena will contest 50 seats).

  गोव्यात आघाडीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत चर्चा

  माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी सपात प्रवेश केला. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपने सावध राहावे. लाटांचे तडाखे बसायला लागलेत. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

  गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे. काल गोव्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू असे त्यांनी सांगितले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022