मुंबई ते UP व्हाया मथुरा! डायरेक्ट योगी आदित्यनाथ विरोधात शिवसेना उमेद्वार देणार; मथुरेतून प्रचाराचा नारळ फुटणार

उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना ताकतीने उतरणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खा राऊत यानी मुजफ्फरनगर येथे किसान आंदोलनेचे नेते राकेश टिकैत याची भेट घेत त्यांना राज्यात भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. खा राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  हे अयोध्येत  लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असेही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  यूपीत ५० ते शंभर जागा लढण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले(Shiv Sena will field candidate against Yogi Adityanath Information of Sanjay Raut ). 

  नवी दिल्ली : उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना ताकतीने उतरणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खा राऊत यानी मुजफ्फरनगर येथे किसान आंदोलनेचे नेते राकेश टिकैत याची भेट घेत त्यांना राज्यात भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. खा राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  हे अयोध्येत  लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असेही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  यूपीत ५० ते शंभर जागा लढण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले(Shiv Sena will field candidate against Yogi Adityanath Information of Sanjay Raut ).

  सर्व भागात ५० ते १०० जागा लढवणार

  राकेश टिकैत यांच्याशी भेट घेतल्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेतल्याचे सांगत आम्ही कुठे लढायचे, किती जागांवर लढायचे हे ठरवणार आहोत, असे राऊत म्हणाले. आम्ही उत्तरप्रदेशच्या सर्व भागात ५० ते १०० जागांवर निवडणूक लढवणार आहोत. यावेळी शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपले आस्तित्व दाखवायचे आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीने लढायचे ठरवले आहे, त्यामुळे उत्तरप्रदेश विधानसभेत शिवसेनेचे अस्तित्व असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले की, अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेही मोठा संघर्ष केला आहे. आम्ही त्या विषयाला चालना दिली. त्याचे श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. अयोध्येत, मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मी दोन चार दिवसांनी मथुरेत जाणार आहे.

  गोव्यातल्या काँग्रेस नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास

  संजय राऊत म्हणाले की, आम्ही काँग्रेसला गोव्यात चाळीसपैकी३० जागा तुम्ही लढा. १० आम्हाला राष्ट्रवादीला आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला एकत्रितपणे द्या, असा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला होता. आम्ही गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही, असे वातावरण आहे. त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण गोव्यातल्या स्थानिक नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे, असे राऊत म्हणाले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022