उत्तर प्रदेशात शिवसेना आपली ताकद दाखवणार, ५० ते १०० जागा लढवणार संजय राऊतांची माहिती

उत्तर प्रदेशच्या सर्व भागात ५० ते १०० जागांसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आहेत, ते आम्हाला भेटत आहेत. या वेळेला शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी आहे. निवडणुकीत काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. मात्र शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये आपली ताकद दाखवणार आहे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमचे प्रतिनिधी असतील याची मला खात्री आहे, असे संजय राऊत म्हणाले.

    मुंबई : आगामी काळात देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरमयान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा करुन शिवसेना उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या सर्व भागात ५० ते १०० जागांसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आहेत, ते आम्हाला भेटत आहेत. या वेळेला शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी आहे. निवडणुकीत काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. मात्र शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये आपली ताकद दाखवणार आहे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमचे प्रतिनिधी असतील याची मला खात्री आहे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान राकेश टिकैत यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल असं राऊत यांनी म्हटले.

    दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार मेरठ, मथुरामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत ज्यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलनात लढा दिला. त्यांची भेट घेणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांविषयी मत आणि त्यांचा कल समजून घेणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याबाबत आढावा घेणार आहे.

    आज दुपारी १२.३० वाजता शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, ते म्हणाले, ‘ आम्ही काही झोळी घेऊन उभे नाहीत त्यांच्यापुढे. आम्ही फक्त राहुल गांधींसमोर प्रपोझल ठेवलं. महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत, गोव्यातही एकत्र लढू. राहुल गांधींशी चर्चा झाली तेव्हा ते याबाबत सकारात्मक आहेत. आम्ही काँग्रेसला म्हणालो, ४० पैकी ३० जागा तुम्ही लढा, उर्वरीत १० जागांवर मित्रपक्ष- राष्ट्रवादी, शिवसेना असे लढू. गेव्यात ज्या जागांवर काँग्रेस याआधी कधीही जिंकू शकली नाही, त्या जागा आम्ही मागितल्या. खिशातलं काही मागितलं नाही. आज काँग्रेसचे तीन आमदारही नाहीत. होते ते सगळे पळून गेले. काँग्रेस सिंगल डिजिटमध्येही येणार नाही. आमच्यासारखे पक्ष काँग्रेसला आधार देत आहेत. पण स्थानिक नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांना सामोरी जाताना दिल्लीत दिली.