ram kadam

मुंबई : रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे सांगत ठाकरे सरकारने मुंबईत रक्तदान शिबीर भरवले. याचे बॅनरही झळकले. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर जहरी टीका केली. त्यांच्या या टीकेला या या शिबीराचे आयोजक असणारे स्थानिक नगरसेवक आणि युवासेना कार्यकारणी सदस्य समाधान सरवणकर यांनी जशास तशे उत्तर दिले आहे.

पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाच महत्व काय समजणार?, त्यांची अक्कल तोकडी आहे,” असा टोला सरवणकर यांनी राम कदम यांना लगावला आहे. तसेच कोव्हिडच्या काळात रक्तदान शिबीर आयोजन न झाल्याने आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे याकडे लक्ष वेधून घेत सरवणकर यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटवरुनच सरवणकर यांनी राम कदम यांना उत्तर दिले आहे.

“राज्यात आणि मुंबईत रक्तसाठ्याचा तुटवडा आहे. या तुटवड्यासाठी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदात्यांना चिकन किंवा पनीरचं आमिष दाखवलं जातंय. अशा प्रकारची नामुष्की ओढवण्यामागे सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे टीकास्त्र राम कदम यांनी सोडले होते. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.