
वरळी बीडीडी चाळीत सिलिंडर स्फोट (Worli Cylinder Blast)होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कुटूंबातील ५ वर्षाचा चिमुकला वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाचे पालकत्व मी स्वत: आणि शिवसेनेने स्वीकारले(Shivsena Adopted 5 year old Boy) आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) यांनी दिली.
मुंबई: मागील आठवड्यात मंगळवारी वरळी बीडीडी चाळीत सिलिंडर स्फोट (Worli Cylinder Blast)होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कुटूंबातील ५ वर्षाचा चिमुकला वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाचे पालकत्व मी स्वत: आणि शिवसेनेने स्वीकारले(Shivsena Adopted 5 year old Boy) आहे. यापुढे मी आणि शिवसेना या बाळाची पालक असेल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) यांनी दिली.
गेल्या आठवड्यात मंगळवारी वरळीच्या बीडीडी चाळीत झालेल्या झालेल्या सिलिंडर स्फोटात संपूर्ण पुरी कुटुंबीय जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार न झाल्याने त्याचे सर्व स्तरात पडसाद उमटले आहे. या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले. वेळेत उपचार न करता निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील एकटा ५ वर्षीय मुलगा वाचला असून तो कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. या मुलाचा ४ महिन्याचा लहान भाऊ, वडील आणि २५ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापौरांनी मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, या मुलाची जबाबदारी आपण स्वता आणि शिवसेनेने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.