शिवसेनेकडून भाजपचा खरपूस समाचार, शेतकऱ्यांना खुनी म्हणणं कुठल्या लोकशाहीत बसतं?

कृषीप्रधान देश असं बिरुद मिरवणाऱ्या हिंदुस्थानातील शेतकरी म्हणजे कोणी खुनी, नक्षलवादी, मारेकरी, अतिरेकी वगैरे आहेत काय? केंद्र सरकारने आणलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय? पण केंद्र सरकार आणि राज्यकर्त्या पक्षाच्या नेत्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा असा काही धसका घेतला आहे की ते आता शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या राज्यकर्त्यांनी आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचे कारस्थान सुरू केले आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवून शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्याबद्दल शेतकऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचा शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून खरपूस समाचार घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना खुनी, दंगलखोर ठरवणं लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय.

कृषीप्रधान देश असं बिरुद मिरवणाऱ्या हिंदुस्थानातील शेतकरी म्हणजे कोणी खुनी, नक्षलवादी, मारेकरी, अतिरेकी वगैरे आहेत काय? केंद्र सरकारने आणलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय? पण केंद्र सरकार आणि राज्यकर्त्या पक्षाच्या नेत्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा असा काही धसका घेतला आहे की ते आता शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या राज्यकर्त्यांनी आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचे कारस्थान सुरू केले आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय.

राज्यातील हजारो शेतकरी रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना हरयाणाचे मुख्यमंत्री महोदय मात्र स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा उडवीत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता खट्टर पालिका निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळेच अंबाला येथे प्रचारासाठी आलेल्या खट्टर यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला. खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्यचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे, असा सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

या अग्रलेखाला आता भाजपकडून काय उत्तर येतं, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.