nitesh rane and aditya thackeray

भाजप सदस्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधान भवन परिसरात ‘म्याव म्याव’  असे आवाज काढत शिवसेनेच्या नेत्यांना चिडविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभेत माहितीच्या मुद्याव्दारे आक्षेप (Shivsena's Objection On Nitesh Rane Behavior) नोंदविला.

    मुंबई : भाजप सदस्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधान भवन परिसरात ‘म्याव म्याव’  असे आवाज काढत शिवसेनेच्या नेत्यांना चिडविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी विधानभवनाच्या आवारात सदस्यांनी अंगविक्षेप करणे किंवा आवाज काढणे अथवा नकला करण्याबाबत शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभेत माहितीच्या मुद्याव्दारे आक्षेप (Shivsena’s Objection On Nitesh Rane Behavior) नोंदविला.

    सदनाच्या पावित्र्याचा भंग होता कामा नये
    यासंदर्भात प्रभू यांच्या हरकतीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली. ते म्हणाले की सकाळीच तालिका अध्यक्षांनी यासंदर्भात सदस्यांना समज दिली आहे. मात्र सदनात जो विषय उपस्थित केला जातो त्याची तातडी देखील लक्षात घेवून विषय मांडायला हवेत. त्यानंतर प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा हा शब्द मागे घेत माहितीचा मुद्दा मांडत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सदनाच्या पावित्र्याचा भंग होता कामा नये हीच या मुद्यामागची भावना आहे. त्यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गांभिर्याने वर्तन केले पाहिजे असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली.