bjp banner

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोर(ed office) ‘भाजप प्रदेश कार्यालय’(bjp state headquarter banner) असा बॅनर लावला आहे.

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोर(ed office) ‘भाजप प्रदेश कार्यालय’(bjp state headquarter banner) असा बॅनर लावला आहे. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.

संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असं पोस्टर लावून शिवसेनेने भाजप तसेच ईडीला टोला हाणला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली आहे. ईडीच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर सरकार पाडण्यासाठी सातत्याने आपल्याला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.