प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वीजजोडणी तोडण्यासाठी देण्यात आलेली स्थगिती उठवली आहे. वीजजोडणी तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वीजबिल थकबाकीदारांना कारवाईचा शॉक बसणार आहे.

    मुंबई : वीजजोडणी तोडण्यासाठी देण्यात आलेली स्थगिती उठवली आहे. वीजजोडणी तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वीजबिल थकबाकीदारांना कारवाईचा शॉक बसणार आहे.

    ऊर्जामंत्र्यांनी वीज तोडणीसंदर्भात निवेदन काढले आहे. यामुळे थकबाकीदारांवर वीज तोडणीची टांगती तलवार राहणार आहे.
    थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास स्थगिती देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होते.

    मात्र, त्यांच्या आश्वासनाला बगल देत ऊर्जामंत्री नितीन राऊत ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच वीजजोडणी तोडण्यावर देण्यात आलेली स्थिगिती देखील उठवली आहे.