प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ठाण्यातील तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या नराधमाला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली(Shocking case of rape and murder of a three-year-old girl in Thane; High court upholds death sentence). रामकिरत मुनीलाल गौड असे दोषीचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला २०१९ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

    मुंबई : ठाण्यातील तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या नराधमाला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली(Shocking case of rape and murder of a three-year-old girl in Thane; High court upholds death sentence). रामकिरत मुनीलाल गौड असे दोषीचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला २०१९ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

    ठाण्यातील कासारवडवली भागातील जेबी रोड येथे २०१३ साली तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला होता. शवविच्छेदनात चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले. पोलीस तपासात रामकिरत गौडने मुलीची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर त्याला ३० ऑक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली. मुलीचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी चिखल होता. तर रामकिरतच्या चपलेवरही चिखल होते. न्याय वैद्यकीय तपासणीत हा महत्त्वाचा पुरावा ठरला होता.

    या प्रकरणात १३ साक्षीदारांनी न्यायालयासमोर साक्ष नोंदवली होती. याप्रकऱणी पोक्सो कायद्यातर्गत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने मार्च २०१९ मध्ये रामकिरत गौडला फाशीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला गौडने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर, गुरुवारी न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. न्यायालयाने रामकिरत गौडची फाशीची शिक्षा कायम ठेवली.