सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, जनता आणि ईश्वर भाजपच्या बाजूने – प्रवीण दरेकर

केवळ सिंधुदुर्गातील जनतेचा भाजपवर असलेला विश्वास आणि ईश्वराचे असलेले पाठबळ हे कारणीभूत आहे. कारण ईश्वरी चिठ्ठी टाकल्यानंतर त्याचा कौलही भाजपच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग बँक विजयानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील १९ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळवून भाजपने वर्चस्व मिळवले आहे.

    मुंबई : सिंधुदुर्गातील जनता आणि ईश्वराचे पाठबळ हे भाजपच्या बाजूने असल्याने भाजपचा जिल्हा बँकेत विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने होतो आहे. मात्र अशा वातावरणातही पार पडलेल्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

    केवळ सिंधुदुर्गातील जनतेचा भाजपवर असलेला विश्वास आणि ईश्वराचे असलेले पाठबळ हे कारणीभूत आहे. कारण ईश्वरी चिठ्ठी टाकल्यानंतर त्याचा कौलही भाजपच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग बँक विजयानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील १९ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळवून भाजपने वर्चस्व मिळवले आहे. एकूण निकालात राणेंची सरशी झाल्यानं भाजप व राणे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे संपूर्ण कोकणातील वातावरण तापले होते. या निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्व काम राहिले असून त्यांनी एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवला आहे.

    सिंधुदुर्ग हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून त्यांचा जिल्ह्यातील सर्व संस्थांवर पकड राहिली आहे. मात्र, यावेळी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक महाविकास आघाडीने टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्या अटकेमुळे नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आल. दरम्यान जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.