
निलंबनाच्या कारवाईवरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात दोन वर्षांपासून गेले नाही. मग निलंबित काय करायचं? असा खोचक सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आपण सुद्धा दोन वर्ष गैरहजर आहात, मग आपणाला सुद्धा निलंबित...? आणि मग कर्मचाऱ्यांचे निलंबित कसे? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे.
मुंबई : मागील एक महिन्यापेक्षा अधिक राज्यातील एसटी कर्मचारी अद्यापही संपावरच ठाम आहेत. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत पगारवाढ केली. मात्र अद्यापही कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळे सेवेत रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या निलंबनाच्या कारवाईवरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात दोन वर्षांपासून गेले नाही. मग निलंबित काय करायचं? असा खोचक सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आपण सुद्धा दोन वर्ष गैरहजर आहात, मग आपणाला सुद्धा निलंबित…? आणि मग कर्मचाऱ्यांचे निलंबित कसे? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे.
मग काय निलंबित करायचं? pic.twitter.com/diOfa7QUK4
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 14, 2021
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एसटी कर्मचारी संपात पाठींबा देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या सर्व धरतीवर कर्मचारी अद्यापही आंदोलन करत असल्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई होत आहे. अतापर्यंत हजारो कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आलं आहे. सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याची भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली होती. यावर संदीप देशपांडेंकडून खोचक आणि उपरोधिक टिव्ट करण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची भेट घेतली होती.
एसटी कामगारांना दिलेलं वचन वर्षभरातच विसरलात !
मंत्री आहात कि #Ghajini ? pic.twitter.com/GDS3HY4J2F— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 14, 2021
दरम्यान या टिव्टमध्ये देशपांडे यांनी “गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा” साहेब तुम्हीही दोन वर्षांपासून मंत्रालयाची पायरी चढला नाहीत’ असा घणाघात मनसेकडून करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता वर्षा बंगल्यावरुनच काम पाहत आहेत. कर्मचारी कामावर रूजू झाले नाही यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. जर मुख्यमंत्रीच मंत्रालयात जात नसतील तर मग निलंबित काय करायचं? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वचनाची परिवहन मंत्री अनिल परब यांना आठवण करुन दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेले वचन वर्षभरात विसरलात मंत्री आहात की, गजनी असा सवालही करण्यात आला आहे. अनिल परब यांचं व्यंगचित्र पोस्ट करत त्यावर भ्रष्टाचार, वसुली असे लिहिण्यात आले आहे. तर आमच्या कारकीर्दीत एसटी कामगारांना संघर्ष करायला लागणार नाही या वचनाचीही परिवहन मंत्री अनिल परब यांना आठवण करुन दिली आहे. दरम्यान टिव्टच्या माध्यमातून आणि व्यंगचित्रातून मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यावर केलेल्या टिकेला आता शिवसेना कसे उत्तर देत हे पाहवे लागेल.