…म्हणून गंगुबाई सिनेमाविरोधात तुर्तास सुनावणी नको; मुंबई उच्च न्यायालयाचे दंडाधिकारी न्यायालयाला निर्देश

`गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यावर तूर्तास दंडाधिकारी न्यायालयाला सुनावणी न घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवले(... so no immediate hearing against Gangubai cinema; Mumbai High Court directs magistrate court).

    मुंबई :`गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यावर तूर्तास दंडाधिकारी न्यायालयाला सुनावणी न घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवले(… so no immediate hearing against Gangubai cinema; Mumbai High Court directs magistrate court).

    अभिनेत्री आलिया भटचा आगामी सिनेमा `गंगूबाई काठियावाडी’ हा `माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या एस. हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे. मात्र, या सिनेमाला गंगूबाई यांचे दत्तक पुत्र बाबुजी शहा यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट, झैदी आणि अन्य काही जणांना समन्स बजावले आहे. या पुस्तक आणि सिनेमामुळे माझी आणि गंगुबाई यांची प्रतिमा मलिन झाली आहे आणि चुकीची माहिती पुस्तकात दिली असल्याचा दावा शहा यांनी केला आहे.

    दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या समन्सला भन्साळीसह सर्व पक्षकारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर बुधवारी न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. शहा हे गंगुबाई यांचे दत्तक पुत्र आहेत हे सिद्ध होणे आवश्यक असून कुटुंबातील सदस्य किंवा घनिष्ठ नातेवाईक यामध्ये दाद मागू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच तूर्तास दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले समन्स आणि कार्यवाहीवर स्थगिती दिली आहे.