…म्हणून आमची तिकीटे कापली जायची; भाजपच्या माजी आमदाराने मोठा गौप्यस्फोट करत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटे कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.

    मुंबई : भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटे कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.

    ते म्हणाले, 1999 पर्यंत काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व होते. राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. कोण कधी वर जातो तर कधी खाली येत असतो. सहकार क्षेत्रात काँग्रेसची ताकद निर्माण केली. तरीही मला 2009मध्ये तिकीट नाकारण्यात आले असे ते म्हणाले.

    हे सुद्धा वाचा