सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.' असे ट्विट धंनजय मुंडे यांनी केले आहे.

     

    मुंबई:राज्यात सर्वत्रचा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनही जाहीर केले आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेनंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंडे यांनी स्वतः ट्वीट करत संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.


    ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.’ असे ट्विट धंनजय मुंडे यांनी केले आहे.

    यापूर्वीही धनंजय मुंडे यांना जून २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्यानं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यासोबतच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती.