सोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार

सोमय्या यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी “आज दुपारी 2 वाजता मी ईडी ED मुंबई कडे मंत्री हसन मुश्रीफ परिवार आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना (ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ) घोटाळा ची तक्रार दाखल करणार” असल्याचं सांगीतलं आहे.

    भाजप नेते किरीट सोमय्या आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार आहेत. काल सोमवारी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी आपण आज मंगळवारी ईडी कार्यालयात जाऊन हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचं सांगीतलं.

    यासंदर्भात सोमय्या यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी “आज दुपारी 2 वाजता मी ईडी ED मुंबई कडे मंत्री हसन मुश्रीफ परिवार आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना (ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ) घोटाळा ची तक्रार दाखल करणार” असल्याचं सांगीतलं आहे.

    दरम्यान, यापुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्टेशनवर गाडीतून खाली उतरवत ताब्यात घेतलं. ते कोल्हापुरला जाऊन गृहमंत्री हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार उघड करणार होते. कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत लोक एकत्र येऊ नयेत म्हणून जिल्हाबंदी केली. आणि 20 आणि 21 सप्टेंबर रोजी कलम 144 लावले आहे.

    किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मंत्री मुश्रीफ हे विवीध भ्रष्टाचारात सहभागी असून त्यांनी नातेवाईकांच्या नावावर बेनामी मालमत्ता ठेवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणार होते. व कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार उघड करणार होते.