सोनम कपूर म्हणते सुधीर मुनगंटीवार अनपढ अडाणी, LGBTQ समाजावर केलेल्या टीकेवरुन काढली अक्कल

विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्यावर सोनम कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. सोनमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. तीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर मुनगंटीवार यांचा फोटो शेअर केला आहे.

    चित्रपटांसोबतच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर वेळोवेळी सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही आपले मत मांडण्यासाठी चर्चेत असते. अनेक मुद्द्यांवर ती मनमोकळेपणाने आपली विधाने करत असते. आता सोनम कपूरने भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी LGBTQ समुदायाचा अपमान केल्यामुळे सोनमने ही टीका केली आहे.

    विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्यावर सोनम कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. सोनमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर मुनगंटीवार यांचा फोटो शेअर केला आहे. आणि या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ सोशल मीडियावर सोनमची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनम कपूरचे चाहते तिच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सोनम कपूर सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासोबतच ती सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही बोलत असते.

    नेमकं काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?

    सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, “समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का? कोणी व्यक्ती मी समलैंगिक आहे, मला समलैंगिक संबंध ठेवण्याचं आकर्षण आहे असं लिहून देईन का? हे कोण सिद्ध करणार सचिव, मंत्री, राज्यमंत्री? तुम्ही सिद्ध करणार आहे का? याला समलैंगिक संबंधाचं आकर्षण आहे असं मंत्री उदय सामंत लिहून देणार आहेत का? यापुढे तर आणखी एक अलैंगिक संबंध आहेत. याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला तर तो सदस्य. आता तो जनावर त्याला प्रमाणपत्र देणार का की याने माझ्याशी संबंध ठेवला.”