राज्यातील सहा जिल्ह्यात हत्तीरोगाविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार!

हत्ती रोगाचे ३१,२५६ रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय हायड्रोसिलची ११,९२९ प्रकरणी सापडली आहेत. त्यामुळे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यात उद्यापासून विशेष लसीकरण अभियान हाती घेतले जात आहे.

  मुंबई: राज्यातील सहा जिल्ह्यात हत्ती रोगा विरोधात जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार राज्याच्या औषध प्रशासनाव्दारे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला उद्यापासून सुरूवात होत असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. राज्यात फिलारयसीस चा प्रभाव असलेल्या १८ जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये हत्ती रोगाचे ३१,२५६ रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय हायड्रोसिलची ११,९२९ प्रकरणी सापडली आहेत. त्यामुळे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यात उद्यापासून विशेष लसीकरण अभियान हाती घेतले जात आहे. ते १५ जुलै पर्यत चालणार आहे.
  हत्ती रोग हा दुसरा मोठा दुर्धर आजार
  जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार हत्ती रोग हा दुसरा मोठा दुर्धर आजार समजला जातो ज्याने डासांच्या माध्यमातून मोठ्या लोकसंख्येला प्रभावित केले आहे. लहानपणीच्या काळात याची लागण होण्याचे प्रमाण जास्त असून दुर्गम जंगलाच्या भागातील लहानग्यांना त्याची बाधा मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो.

  पोलिओच्या मोहिमेप्रमाणे मौखिक लस
  महाराष्ट्रात एकूण १८ जिल्हयात याप्रकारचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी पोलियोच्या मोहिमे प्रमाणे मौखिक लस लहानग्यांना देण्याचे अभियान राबविण्यात येते. राज्यातील सहा जिल्ह्यात पुढील १५ दिवस या प्रकारे हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

   जागरूकतेसाठी कार्यशाळा
  याबाबतची एक कार्यशाळा देखील काल घेण्यात आली  ज्यात या रोगाशी लढण्याबाबत आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत एका चित्रफितीव्दारे कार्यशाळेत संबोधित करताना सांगितले की, एन्टी फलेरिया औषधोपचार राज्य सरकार कडून संपूर्णत: मोफत दिला जात असून त्याचा ग्रामिण दुर्ग्म भागातील बालकांच्या आरोग्याशी निकटचा संबंध आहे. राज्याचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ संजिव जाधव यांनी देखील आरोग्य कर्मचा-यांच्या या मोहिमेला नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.