अटक करण्यात आलेले जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघेही जान मोहम्मद शेखकरवी काम करत असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी अतिरेक्यांच्या निशाण्यावर मोठे पूल आणि रेल्वे ट्रॅक होते असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर या वेळी अतिरेक्यांचा स्फोट घडवून आणण्याचा कट होता.
मुंबई : दिल्ली पोलीसांनी सहा अतिरेक्यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसांनी अटक केलेल्या हा तिसरा संशयीत आहे. धारावीत राहणारा जान मोहम्मद शेख याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा हँडलर जाकीर हुसेन शेख या अतिरेक्याला मुंबईतून अटक केली होती. आता मुंबई एटीएसने धडक कारवाई करत आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान मोमीन असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.
गर्दीची ठिकाणे अतिरेक्यांच्या निशाण्यावर
अटक करण्यात आलेले जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघेही जान मोहम्मद शेखकरवी काम करत असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी अतिरेक्यांच्या निशाण्यावर मोठे पूल आणि रेल्वे ट्रॅक होते असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर या वेळी अतिरेक्यांचा स्फोट घडवून आणण्याचा कट होता.
पूल आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचे खास प्रशिक्षण
पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये पूल आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दहशतवाद्यांनी गर्दीच्या रेल्वे मार्गांचा आणि त्यांच्या वेळेचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये दीड किलो आरडीएक्सही सापडल्याने खळबळ उडाली आहे.