संपक-यांमध्ये फूट? ५४ दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा; विलीनीकरणाबाबत लढा सुरू ठेवण्यावर कर्मचारी ठाम

राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय कुमार गुजर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटल्याची घोषणा केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर एसटीच्या कर्मचारी संघटनेने विलीनीकरणाबाबतचा मुद्दा कायम असल्याचे सांगत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला(Split between contacts? ST workers call off strike after 54 days; Employees insist on continuing the fight over mergers). राज्यातील संप मागे घेतल्याची घोषणा राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने केलेल्या घोषणेनंतर संपक-यांमध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे मात्र गुजर यानी मात्र फूट नसल्याचा दावा करत सांगितले की, संपाची पहिली नोटीस आम्ही दिली आहे आणि त्यानुसार आम्ही न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहून चर्चा केली आणि संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयीन लढा सदावर्ते यांच्यामार्फत सुरूच राहील असे ते म्हणाले.

    मुंबई : राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय कुमार गुजर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटल्याची घोषणा केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर एसटीच्या कर्मचारी संघटनेने विलीनीकरणाबाबतचा मुद्दा कायम असल्याचे सांगत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला(Split between contacts? ST workers call off strike after 54 days; Employees insist on continuing the fight over mergers).

    विलीनीकरणाबाबत लढा सुरूच राहणार

    याबाबत माध्यमांसमोर बोलताना अजयकुमार गुजर यानी सांगितले की ५४ दिवसांपासून संप केला मात्र अद्याप न्यायालयीन लढाइला किती वेळ लागेल याची निश्चिती नसल्याने चर्चा करून सुधारीत वेतनवाढ, निलंबीत सेवा समाप्तीच्या कारवाया हजर होणा-यांवर मागे घेण्यास मान्यता या मुद्यांवर संप मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र विलीनीकरणाबाबत जो निर्णय होईल त्याबाबत न्यायालयात लढा सुरूच राहणार आहे, उच्च न्यायालयात निकाल विरोधात गेला तरी सर्वोच्च न्यायालयात जावू मात्र तूर्तास संप मागे घेत असल्याचे गुजर म्हणाले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संयुक्त पत्रकार परिषद घेत संप मागे घेतल्याची घोषणा केली.

    संपक-यांमध्ये फूट

    दरम्यान, राज्यातील संप मागे घेतल्याची घोषणा राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने केलेल्या घोषणेनंतर संपक-यांमध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे मात्र गुजर यानी मात्र फूट नसल्याचा दावा करत सांगितले की, संपाची पहिली नोटीस आम्ही दिली आहे आणि त्यानुसार आम्ही न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहून चर्चा केली आणि संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयीन लढा सदावर्ते यांच्यामार्फत सुरूच राहील असे ते म्हणाले.