ST Bus Workers Strike: If you want to discuss, do it directly with us, if not ... ST workers challenge the government

मराठा पत्रकार संघात एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत पत्रकार परिषद घेतली. परिवहन मंत्री अनिल परब यांना कोणाशी चर्चा करावी? असा प्रश्न पडला असल्याचे सांगत आम्ही चर्चेला तयार आहोत, थेट आमच्याशी चर्चा करा, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले( ST Bus Workers Strike: If you want to discuss, do it directly with us, if not ... ST workers challenge the government).

    मुंबई : मराठा पत्रकार संघात एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत पत्रकार परिषद घेतली. परिवहन मंत्री अनिल परब यांना कोणाशी चर्चा करावी? असा प्रश्न पडला असल्याचे सांगत आम्ही चर्चेला तयार आहोत, थेट आमच्याशी चर्चा करा, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले( ST Bus Workers Strike: If you want to discuss, do it directly with us, if not … ST workers challenge the government).

    आम्ही स्वयंस्फूर्तीने संप पुकारला असून आम्हाला विविध पक्षांसह सामाजिक संघटनांचाही पाठिंबा आहे. त्यांचे आम्ही स्वागतच करतो, परंतु, पाठिंबा दिला नाही तरीही आम्ही संपावर कायम आहोत, असेही कर्मचारी म्हणाले.

    ग्रामीण भागात सध्या शाळा सुरू झाल्या असून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसाेय होत आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी ‘आमचीही मुले शिक्षण घेत आहेत’, असे सांगत समस्यांचा पाढाच वाचला. कमी पगार, तोही वेळेत नाही, मग आम्ही काय माणसे नाहीत काय?

    सण-उत्सव आम्हालाही आहेत. आमची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात, त्यांना साधे वह्या पुस्तके पुरवण्याची अडचण आमच्यासमोर आहे. ती गरज आम्ही कशी भागवावी? असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत हा संप असाच कायम राहणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.