एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, अन्यथा कारवाई करु अनिल परबांचा इशारा

आता पगारवाढ झाली असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. परंतु उद्यापर्यंत (शुक्रवारी) एसटी कर्मचारी जर कामावर हजर राहिले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

    मुंबई : बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक पाऊल टाकत,  पगारवाढ केली आहे. एसटी विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयीन आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे अंतरिम पगारवाढ करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आता पगारवाढ झाली असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. परंतु उद्यापर्यंत (शुक्रवारी) एसटी कर्मचारी जर कामावर हजर राहिले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. त्यामुळ कर्मचारी यांनी या भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. न्यायालयाने एसटी विलीनीकरणाबाबत समिती गठीत केली असून ही समिती १२ आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. व पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी देण्यात आली आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा सुटावा यासाठी राज्य सरकारने अंतरिम पगारवाढ केली आहे. एसटीच्या इतिहासात एवढी मोठी पगारवाढ पहिल्यांदाच करण्यात आली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करुन कामावर हजर व्हावे असे आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. अन्यथा आम्हाला

    आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार घेतली असून, आता कर्मचाऱ्यांवर पुढील आंदोलनाची जबाबदारी सोपवली आहे. पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे आंदोलन सुरुच राहणार आहे. दरम्यान यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू त्यानंतर कठोर निर्णय घेऊ असा स्पष्ट इशाराच अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.