खोत आणि पडळकरांवर एसटी कर्मचाऱ्यांना संशय; आझाद मैदानात नाराजीनाट्य? दोन्ही नेते काढता पाय घेण्याच्या तयारीत

काल (दि. २३) सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, त्यावेळीस विलीनीकरणासाठी गठीत समितीचा अहवाल येण्यास वेळ असल्याने एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र त्यासाठी संप मागे घेण्याची अट ठेवण्यात आली होती. त्यावर कामगार नेत्यांची रात्री आणि सकाळी चर्चा झाली. तुटेपर्यंत ताणू नये असे भाजप आमदार सदाभाऊ खोत यानी माध्यमांसमोर सांगितल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असलेल्या काही कर्मचारी आणि संघटनाच्या पदाधिका-यानी यात राजकारण होत असून भाजप नेते तडजोड करत असल्याने संशय व्यक्त केला.

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकारकडून काल (दि २३) व्यवहार्य पर्याय दिल्यांनतर त्यावर चर्चा करताना आझाद मैदानात जमलेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोनवर भाजपचे नेते मँनेज झाल्याचे संदेश आल्याने काही काळ गोंधळ उडाला. त्यामुळे संपाच्या चर्चांना जाण्याऐवजी पडळकर आणि खोत या दोन्ही भाजप आमदारानी आंदोलन सोडून जात असल्याची घोषणा केली. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी त्याना अडवून लोटांगण घालत माफी मागितल्यानंतर हे नाराजीनाट्य संपले आणि दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून सह्याद्रीवर चर्चेला गेले.

    विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम

    काल (दि. २३) सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, त्यावेळीस विलीनीकरणासाठी गठीत समितीचा अहवाल येण्यास वेळ असल्याने एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र त्यासाठी संप मागे घेण्याची अट ठेवण्यात आली होती. त्यावर कामगार नेत्यांची रात्री आणि सकाळी चर्चा झाली. तुटेपर्यंत ताणू नये असे भाजप आमदार सदाभाऊ खोत यानी माध्यमांसमोर सांगितल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असलेल्या काही कर्मचारी आणि संघटनाच्या पदाधिका-यानी यात राजकारण होत असून भाजप नेते तडजोड करत असल्याने संशय व्यक्त केला.

    आझाद मैदानात नाराजीनाट्य

    मात्र, असे असेल तर आम्ही घरी जातो, तुम्हाला हवा तसा निर्णय घ्या अशी भुमिका घेत पडळकर आणि खोत यानी जाण्यास सुरूवात केली. मात्र त्यांना अडविण्यात आले. असे चर्चेला जाण्यापूर्वीच आझाद मैदानात नाराजीनाट्य रंगले. त्यानंतर दोन्ही नेत्यानी सागर बगला गाठून विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि नंतर बैठकिला रवाना झाले.