एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती

सध्याची कोव्हीड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन, सदर योजनेला ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ (Period Increased Of Smart Card Scheme) देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab)यांनी दिली आहे.

    मुंबई: कोरोना(Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला(Smart Card Scheme) ३० सष्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची कोव्हीड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन, सदर योजनेला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ (Period Increased Of Smart Card Scheme) देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab)यांनी दिली आहे.

    महाराष्ट्र् शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड ’ काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिले असल्याने तसेच अनेक जेष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने सदर योजनेला पुढील ३ महिने, म्हणजेच ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.