anil parab padalkar khot

गेल्या १४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Workers Strike)आणि आंदोलन सुरु आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब(Anil Param Meeting With Gopichand Padalkar And Sadabhau Khot) यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना निमंत्रण दिले आहे.

    मुंबई: मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर(Sahyadri Guest House) आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेल्या १४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Workers Strike)आणि आंदोलन सुरु आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब(Anil Param Meeting With Gopichand Padalkar And Sadabhau Khot) यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना निमंत्रण दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह पडळकर आणि खोत हे अनिल परबांच्या भेटीला पोहचले आहेत. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आता या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

    दरम्यान याबाबत सकाळी शरद पवार आणि अनिल परब यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती आहे. विलीनीकरण शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ देण्याचा सल्ला पवारांनी परबांना दिल्याची माहिती आहे. तर ही समस्या मोठी असली तरी तोडग्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शिवसेवा खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान भाजपाकडून सरकारवर टीका सुरुच आहे. प्रवीण दरेकर आणि पंकजा मुंडे यांनी आज या मुद्द्यावर सरकारवर टीका केली आहे.