नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एवढ्या कोटींचा मुद्देमाल जप्त, नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन

हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत १८,७८६ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७,०२८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर ३४ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल २०२० ते २२ डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ३२ हजार २३८ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून १९,४६२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोरबच २६६३ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत १८,७८६ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७,०२८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर ३४ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैधपणे परराज्यातील मद्य विक्रीबाबत आतापर्यंत एकूण ७६५ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ६५६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर १३ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण १८२ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून २१४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ४ कोटी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण ७१ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर २ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

२२ डिसेंबर २०२० पर्यंत परराज्यातील अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे. ४ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथे हरियाणा आणि गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण १,०७६ बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

६ डिसेंबर २०२० रोजी नंदुरबार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण ५०० बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण ४३ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तसेच ६ डिसेंबर २०२० रोजी धुळे येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण १२५० बॉक्स आणि २ वाहने असा एकूण ६५ लाख ३० हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१७ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण १५० बॉक्स आणि मद्य बाटल्यावरील २०,००० बनावट लेबल असा एकूण ११ लाख ८१ हजार ०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१८ डिसेंबर २०२० रोजी पुणे येथे विविध मद्याच्या एकूण ७१० बॉक्स,बिअरचे १९० बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण  ५६ लाख ४८  हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

२३ डिसेंबर २०२० रोजी कणकवली येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे २,७०० ब.लि. मद्य आणि एक टेम्पो असा एकूण २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१५ डिसेंबर २०२० रोजी अंधेरी आणि वांद्रे येथून विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या एकूण ९७ सिलबंद बाटल्या आणि ३ वाहने असा एकूण १० लाख २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१६ डिसेंबर २०२० रोजी चेंबूर येथून बनावट विदेशी मद्याच्या एकूण ३४८ बाटल्या असा एकूण २२ लाख ०४ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१७ डिसेंबर २०२० रोजी बनावट विदेशी मद्याच्या २० बॉटल आणि एक रिक्षा असा एकूण २ लाख २५ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुध्द तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार टोल फ्री क्रमांक -१८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ आणि ईमेल commstateexcise@gmail.com  यावर करु शकतात.