सरकार स्व:तच्या मस्तीत गुंग आहे सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवर टीका

जनतेने राज्य सरकारला सत्तेत बसवले आहे, परंतु जनतेची कोणतीच कामे होत नाहीत. पेपर फुटीपासून टीईटी पेपर, म्हाडा पेपरफुटी आदी प्रश्नाबाबत राज्य सरकार अपयशी ठरले आहे, तसेच या सरकारमध्ये कुठेही समन्वय दिसून येत नाही अशी घणाघाती टीका माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली.

    मुंबई : जनतेने राज्य सरकारला सत्तेत बसवले आहे, परंतु जनतेची कोणतीच कामे होत नाहीत. पेपर फुटीपासून टीईटी पेपर, म्हाडा पेपरफुटी आदी प्रश्नाबाबत राज्य सरकार अपयशी ठरले आहे, तसेच या सरकारमध्ये कुठेही समन्वय दिसून येत नाही अशी घणाघाती टीका माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली.

    दरम्यान आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहेत त्यामुळे दुपारनंतर आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षाचे निवड होणार आहे. तसेच आजच्या दिवशी सुरुवातीलाच विरोधकांनी िधान भवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी करत, आणि हातात फलक धरत, सरकारचा निषेध करत आंदोलन केले. त्यानंतर माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना हे सरकार मस्तवाल झाले आहे. आणि स्वतःच्या मस्तीत गुंग असल्याची बोचरी टीका केली. तसेच एसटी संप एक महिन्यापासून जास्त काळ सुरू आहे, सत्तेत येणे आधी एसटी कर्मचाऱ्यांचे तील लोकांना आश्वासन दिले होते, ते आता हे सरकार विसरले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा किंवा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी सुद्धा टीका सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली.

    त्यावेळी जे आश्वासन दिले होते ते कोणत्या धुंदीत होते याचीसुद्धा राज्य सरकारने विचार करावा जरी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर, महाराष्ट्राच्या जनतेचे सरकारने माफी मागावी अशी बोचरी टीका सुद्धा मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली.