राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर लॉकडाऊन अटळ – आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या(corona patients) अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनची(chances of lockdown in maharashtra) वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवे, असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(rajesh tope) यांनी केले आहे.

    मुंबई : देशात कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या खूप वाढत आहे. या परिस्थितील राज्यात लसीकरणावर अधिक जोर दिला जात असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(rajesh tope) यांनी सांगितले. हे सांगत असताना त्यांनी गुजरात व बंगालमधील व्यवस्थेवर टीका केली. कोरोना वाढत असताना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी आहे. तसेच गुजरातमध्ये आयपीएलचे सामने सुरू आहेत. हे चुकीचे आहे.

    ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवे.

    टोपे पुढे म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी पातळीवर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यासाठीच्या उपाययोजनाही वेगाने करायला लागत आहेत. राज्यात जम्बो सेंटर सुरु  करणं गरजेचं आहे. तसेच डॉक्टर्सची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

    राजेश टोपे यांनी सांगितले की, गेल्या १,२ महिन्यांमध्ये रुग्णसंख्या पूर्ण रोडावली होती. त्यामुळे onboard घेतलेले डॉक्टर रिलिव्ह केले होते. आता त्यांना परत बोलवावे लागेल.

    लसीकरणाबाबत ते म्हणाले की आत्तापर्यंत ४५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. २४०० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ६०० ठिकाणी लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. लस पडून असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत . ते खोटे आहे. राज्यामध्ये रोज ३ लाख लसी देण्यात येत आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.