दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली भेट

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी  आज (गुरुवारी) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळ राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. 

    नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी  आज (गुरुवारी) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळ राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.

    प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शाह यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाल्याचे समजते.

    सध्या राज्यात अनेक महत्त्वाच्या विषयावरुन राजकारण तापले आहे, एसटी कर्मचारी संप, एनसीबी, समीर वानखेडे, नवाब मलिक, महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळे, शंभर कोटी वसुली प्रकरण आदी विषयांमध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तसेच अनेक गौप्यस्फोट व खुलासे होत आहेत, यावर सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आमदार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांतदादा पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

    भाजपाचे आगामी लक्ष्य मुंबई पालिका  

    मुंबई महानगर पालिकेची निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च २०२२ मध्ये होऊ घातली आहे, मागील निवडणुकीत भाजपाचा निसटात पराभव झालेला होता, त्यामुळं या पालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत कमळ फुलवायचे आहे, या निर्धाराने भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पालिका निवडणुकीत कोणती रणनिती आखायची याबाबत सुद्धा या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्यांची सुत्रांची माहिती आहे.